वाई पर्यटन

वाई हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे.

वाई सातारा जिल्ह्यातील एक तालुका व महत्त्वाचे शहर आहे. कृष्णा नदीच्या काठावर असलेले आणि दक्षिण काशी म्हणुन प्रसिद्धीस पावलेले धार्मिक क्षेत्र म्हणजेच वाई. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये एकाच दगडातुन सलगपणे घडविलेली, वाईचे ग्रामदैवत असलेली ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे.

वाई यथील वैशिष्टे म्हणजे श्री सिध्देश्वर मंदिरातील श्री सिध्दनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमानाचे मंदिर. वाई येथुनच मराठी विश्वकोशाचे प्रकाशन केले जाते.

शुटिंगसाठी देशा-परदेशातली लोकशन्स शोधणारी सिनेमा आणि टीव्ही इण्डस्ट्री सध्या वाईच्या जाम प्रेमात आहे. निसर्गाची मुक्त उधळण, कमालीची स्वस्ताई आणि भौगोलिक वैविध्य यामुळे सिनेमा, सीरिअल आणि जाहिरात इण्डस्ट्रीची पावलं वाईकडे वळतायत. 

आमीर खानची अगदी अलिकडे झळकलेली सॅमसंग मोबाइलची जाहिरात आठवते? 'स्वदेस'च्या शेवटी शेवटी शाहरुख अंगाला लाल माती लावून आखाड्यात उतरतो, तो नदीकाठ आठवतोय? किंवा 'गंगाजल'मध्ये अजय देवगण पारावर उभा राहून ग्रामस्थांना त्वेषानं उपदेश करतोय, ते दृश्य येतंय डोळ्यासमोर? बरं, 'अगले जनम मोहे बिटिया किजो', 'बैरी पिया' या हिंदी सीरिअल्समधली दृश्य डोळ्यासमोर आणा. यातली लोकेशन्स, नदीचा घाट, घरांची रचना यांचा तुम्हाला एक समान धागा आढळेल. ही सगळी दृश्य आहेत वाई आणि परिसरातली. 

लोकेशन्स : मेणवलीचा घाट आणि वाडा, धोम धरण, वाईतलं मिशन हॉस्पिटल, कृष्णा काठचे सातही घाट, एसटी स्टँड, गाढवेवाडीचा चौसोपी वाडा, पसरणी, किसन वीर कॉलेज इ. 

२००९ पासून आजवर झालेली शुट्स... 

सीरिअल्स : भाग्यविधाता, अगले जनम मोहे बिटिया किजो, छोटी बहू, श्री, बैरी पिया, गंगा, महाभारत, बिट्टो, काशी, गीत, सुपरस्टार, ओळख 

चित्रपट : दबंग आणि विहीर, विथ लव्ह टू ओबामा

रस्ते:

 1. पुणे-खेड शिवापूर-शिरवळ-खंबाटकी घाट-सुरुर-वाई.
 2. पुणे-खेड शिवापूर-भोर-मांढरदेव घाट-वाई.
 3. मुंबई-पुणे-खेड शिवापूर-शिरवळ-खंबाटकी घाट-सुरुर-वाई.
 4. सातारा-पाचवड-भुइंज-ओझर्डे-वाई.

मुक्काम आणि जेवणाची सोय: वाई, सातारा, पाचगणी, महाबळेश्वर.

आसपासचा परिसर:

 1. सातारा
 2. प्रतापगड
 3. महाबळेश्वर
 4. पाचगणी
 5. कमलगड
 6. पांडवगड
 7. मधुमकरंदगड